[Nashik] - फर्निचर खरेदीची लगीनघाई

  |   Nashiknews

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

आदिवासी विभागाकडून आश्रमशाळा आणि वसतिगृहांसाठी वादग्रस्त फर्निचर खरेदीबाबतचा वाद उच्च न्यायालयात प्रलंबित असताना, तसेच वस्तूंच्या हमीवरून वाद उठला असताना, विभागाने आता फर्निचर खरेदीची लगीनघाई सुरू केली आहे.

आदिवासी विकास विभागाकडून कायापालट अभियानांतर्गत तब्बल ३२५ कोटींची फर्निचर खरेदी केली जाणार आहे. सुरुवातीला ११२ कोटींच्या या फर्निचर खरेदीने कोट्यवधींचा टप्पा गाठला. विशेष म्हणजे या खरेदीसाठी मंत्रालयातूनच सूत्रे फिरल्याने सर्व नियम धाब्यावर बसविण्यात आले. मुंबईस्थित नामांकित कंपन्या कशा पात्र ठरतील या पद्धतीनेच निविदा प्रक्रियेचा प्रवास सुरू राहिला. त्यामुळे तत्कालीन आदिवासी मंत्री विष्णू सावरा यांनीच या प्रक्रियेला स्थगिती दिली होती, तर अपात्र कंपन्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यामुळे सदरची खरेदी न्यायप्रविष्ट असताना वस्तूंची नावे बदलून खरेदीचा बार उडवला जात आहे. सावरांची गच्छंती झाल्यानंतर मंत्रालयातून पुन्हा सूत्रे फिरली असून, आता थेट पात्र कंपन्यांना साहित्य खरेदीचे आदेश देण्यात आले आहे....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/EPagXAAA

📲 Get Nashik News on Whatsapp 💬