[Pune] - अज्ञाताकडून वृद्धाची फसवणूक

  |   Punenews

क्रेडिट कार्डची माहिती घेऊन ५० हजारांचा गंडा

म. टा. प्रतिनिधी, पुणे

ज्येष्ठ नागरिकाच्या क्रेडिट कार्डाची माहिती घेऊन त्याद्वारे परस्पर ५० हजार रुपयांची खरेदी करण्यात आल्याचा प्रकार कॅम्पमध्ये ईस्ट स्ट्रीट परिसरात उघडकीस आला आहे. या प्रकरणी एका ८१ वर्षीय व्यक्तीने लष्कर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात व्यक्तीच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अज्ञात व्यक्तीने ज्येष्ठ नागरिकाला मोबाइल फोनवर फोन करून, 'तुमच्या बँकेच्या क्रेडिट कार्डचा नंबर हा तुमचाच आहे का,' असे विचारले. आरोपीने त्यांना दोन-तीन वेळा फोन करून माहिती घेऊन त्यांचा विश्वास संपादन केला. तीन-चार वेळा फोन झाल्यानंतर क्रेडिट कार्डची गोपनीय माहिती घेऊन या व्यक्तीने वृद्धाला ५० हजार रुपयांचा गंडा घातला. शहरात सातत्याने अशा प्रकारे फसवणुकीचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे पोलिसांनी ऑनलाइन शॉपिंगबाबत आणि कार्डच्या गोपनीयतेबाबत खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/M6GqIgAA

📲 Get Pune News on Whatsapp 💬