[Pune] - ... आणि इमाम खान गणपती मंडळाचे अध्यक्ष झाले!

  |   Punenews

पुणे : 'आळीतील गणेशोत्सवाची जबाबदारी आम्ही तरुणांनी घ्यावी, अशी आमची इच्छा होती. प्रभाकरशेठ वाघुलकर आमचे गुरू. त्यांच्या सल्ल्यानुसार आम्ही काम करायचो; पण मला काय माहीत, की मंडळाचा अध्यक्ष म्हणून ते माझेच नाव पुढे करतील. माझे नाव इमाम असल्याने मी घाबरलो. आपल्याला ही जबाबदारी नको, असे वाटले; पण सर्वांनी धीर दिला आणि टेलरिंगचा व्यवसाय करणारा साधा इमाम मोइउद्दीन खान मंडळाचा अध्यक्ष झाला. चाळीस वर्षे जबाबदारी सांभाळली. गणरायाचीच ही कृपा...' गुरुवर्य जगोबादादा तालीम गणपती मंडळाचे माजी अध्यक्ष इमामभाई सांगत होते....

गुरुवर्य जगोबादादा तालमीची स्थापना १८३४ मध्ये झाली. दगडूशेठ हलवाई हे जगोबादादांचे शिष्य, तर वस्ताद अहमदभाई तांबोळी हे दगडूशेठ हलवाईंचे शिष्य. शिवाजी रस्त्यावर श्रीनाथ टॉकीजच्या बाहेर १९४४ पासून तालमीचा गणपती बसतो. यंदा मंडळाचे अमृतमहोत्सवी (७५) वर्ष आहे. पुण्याच्या गणेशोत्सवाने अनेक व्यक्तिमत्त्वे घडवली आणि या व्यक्तित्त्वांनी गणेशोत्सवाला विधायक रूप देऊन एका उंचीवर नेले. इमामभाई त्यापैकीच एक. इमामभाईंना सर्वजण प्रेमाने 'डॅडी' म्हणतात. सामाजिक अभिसरण हा सार्वजनिक गणेशोत्सवाचा प्रमुख उद्देश इमामभाईंच्या नावामुळे सार्थ ठरतो. 'इमामभाई गुलाबपाण्याने गणपतीस अभिषेक करत. कार्यकर्त्यांना गणपतीची आरती पाठ नसताना इमाभाईंना ती पाठ होती व ते स्वतः आरती करत,' असे सांगितले जाते....

फोटो - http://v.duta.us/xQbmEQAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/kaICcgAA

📲 Get Pune News on Whatsapp 💬