[Pune] - मावळमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी

  |   Punenews

म. टा. प्रतिनिधी, पुणे

मावळ विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या उमेदवारीसाठी प्रबळ दावेदार असणाऱ्या सुनील शेळके यांच्या एका जवळच्या कार्यकर्त्याला काल रात्री बेदम मारहाण करण्यात आली. विद्यमान आमदार, राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या समर्थकांनी ही मारहाण केल्याचा दावा शेळके यांनी केला आहे. तळेगाव दाभाडे नजिक वराळे गावात ही घटना घडली आहे.

कल्पेश मराठे असे मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या कार्यकर्त्याचे नाव आहे. मराठे यांचे दोन्ही पाय, एक हात आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. त्याच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. काही तरुणांनी पाईप व लोखंडी दांडक्याने बेदम मारहाण केली. त्यात तो कार्यकर्ता गंभीर जखमी झाला असून या प्रकरणी तळेगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत....

फोटो - http://v.duta.us/XGc5kAAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/wwaNvAAA

📲 Get Pune News on Whatsapp 💬