[Pune] - रखडलेल्या रिंग रोडला गती

  |   Punenews

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) प्रस्तावित रिंग रोडच्या पहिल्या टप्प्यातील तीन किमीच्या जागेचा ताबा गुरुवारी प्राधिकरणाला प्राप्त झाला. त्यामुळे, गेल्या अनेक दिवसांपासून भूसंपादनाअभावी रखडलेल्या रिंग रोडला पुन्हा गती मिळण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. आंबेगाव ते वाघोली दरम्यान फुरसुंगी आणि परिसरातील सुमारे ४० ते ४५ कोटी रुपये किमतीची जागा प्राधिकरणाला मिळाली आहे.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांच्या हद्दीबाहेरून पीएमआरडीएतर्फे १२८ किमीचा रिंग रोड विकसित केला जाणार आहे. त्यातील पहिला ३३ किमीचा टप्पा आंबेगाव ते वाघोलीदरम्यान आहे. पीएमआरडीएच्या ११० मी रुंदीच्या रिंग रोडलगत नगररचना योजना (टीपी स्कीम) विकसित करून जागा मिळविण्याचा प्रयत्न आहे. टीपी स्कीमच्या प्रा-रूप आराखड्याला मान्यता मिळाल्यानंतरच संबंधित जागा प्राधिकरणाच्या ताब्यात येत असल्याने ही प्रक्रिया सध्या रखडली आहे. त्यामुळे, हस्तांतरणीय विकास हक्काच्या (टीडीआर) माध्यमातून या जागा ताब्यात मिळविण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून वाटाघाटी सुरू होत्या. त्याला गुरुवारी यश प्राप्त झाले असून, ३.३ किमीच्या जागेचा आगाऊ ताबा प्राधिकरणाला प्राप्त झाला आहे....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/lnIDWwAA

📲 Get Pune News on Whatsapp 💬