[Pune] - वर्गणी न दिल्यानेव्यापाऱ्याला मारहाण

  |   Punenews

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

गणेशोत्सवाची वर्गणी देत नाही म्हणून आठ ते दहा जणांनी एका व्यापाऱ्याला मारहाण करून गंभीर जखमी केल्याचा प्रकार बुधवारी मध्यरात्री वाकड रस्त्यावरील म्हातोबानगर झोपडपट्टी येथे घडला. या प्रकरणी रमेश देवराम चौधरी (वय ३७, रा. सद्गुरू कॉलनी, वाकड) यांनी वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सागर घडसिंग (रा. सद्गुरू कॉलनी, वाकड) आणि त्याच्या आठ ते दहा साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रमेश चौधरी यांचे सद्गुरू कॉलनी येथे माताजी कलेक्शन नावाचे कपड्यांचे दुकान आहे. बुधवारी रात्री ते दुकान बंद करून जाताना, आरोपी सागर आणि त्याचे आठ ते दहा साथीदार चौधरी यांच्या दुकानापाशी गेले. त्यांच्या दुकानाची जाळी जोरजोरात वाजवू लागले. 'तुम्ही आम्हाला पाच हजार रुपये देणगी का देत नाही,' असे म्हणत चौधरी आणि त्यांच्या आई व भावाला शिवीगाळ करू लागले. 'तुम्हाला खलास करतो,' अशी धमकी देऊन चौधरी, त्यांची आई आणि भावाला आरोपींनी पहारीने; तसेच काठीने मारहाण केली. यात फिर्यादी आणि त्यांची आई जखमी झाली. या प्रकरणी वाकड पोलिस तपास करत आहेत....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/fMaodwAA

📲 Get Pune News on Whatsapp 💬