[Pune] - वीस मिनिटांत अडीच लाखांची चोरी

  |   Punenews

म. टा. प्रतिनिधी, पुणे

घरगुती सामान खरेदी करणाऱ्या युवकाच्या मोपेड दुचाकीच्या डिक्कीतील अडीच लाखांची रोकड चोरट्यांनी लंपास केली. बालाजीनगर, धनकवडी येथे अवघ्या वीस मिनिटांत मंगळवारी (३ सप्टेंबर) सायंकाळी ही घटना घडली. कोंढव्यातील ओशिया पार्क येथे राहणाऱ्या ३९ वर्षीय व्यक्तीने फिर्याद दिली. पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात सहकारनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

तक्रारदार बालाजीनगर येथील पवार हॉस्पिटल परिसरात मंगळवारी रात्री आठ वाजून ३५ मिनिटे ते आठ वाजून ५५ मिनिटे या दरम्यान एका दुकानात गेले होते. या वीस मिनिटांत चोरट्यांनी दुचाकीच्या डिक्कीत खाकी रंगाच्या बॅगेत गुंडाळून ठेवलेली दोन लाख हजार रुपयांची रोकड लंपास केली. खरेदी केलेल्या वस्तू डिक्कीत ठेवण्यासाठी तक्रारदारांनी डिक्की उघडली असता, त्यांना रोकड चोरीला गेल्याचे लक्षात आले....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/oedkKgAA

📲 Get Pune News on Whatsapp 💬