[Solapur] - पुणे पाऊस

  |   Solapurnews

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शहर आणि परिसरात गुरुवारी पावसाच्या हलक्या किंवा तुरळक सरींनी हजेरी लावली. दिवसभर वातावरण ढगाळ राहिले असले तरी शहरात जोरदार पाऊस झाला नाही. पुढील दोन दिवस पुण्यात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तर राज्यात सर्वत्र पावसाची शक्यता आहे.

शहरात गुरुवारी रात्री साडेआठपर्यंत ०.७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. बुधवारी रात्रीपासूनच पावसाचा जोर कमी झाला होता. गुरुवारी हवामान ढगाळ होते. मात्र, काही ठिकाणी झालेला हलका शिडकावा वगळता कोठेही जोरदार पाऊस झाला नाही. रात्री साडेनऊनंतर पुन्हा पावसाच्या हलक्या सरींनी हजेरी लावली.

गुरुवारी सकाळी साडेआठ ते सायंकाळी साडेपाच या वेळेत राज्यातील सर्वाधिक पावसाची नोंद महाबळेश्वर येथे (५१ मिमी) झाली. विदर्भातील अमरावती येथे २६ मिमी, रत्नागिरी येथे २४ मिमी, मुंबई येथे ८, कोल्हापूर येथे ७, सातारा येथे एक मिमी पावसाची नोंद झाली....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/LjAkNAAA

📲 Get Solapur News on Whatsapp 💬