[Thane] - कायमस्वरूपी मूर्तींतून प्रदूषणमुक्ती

  |   Thanenews

पर्यावरणसंवर्धनासाठी चळवळ उभारण्याचा पर्यावरणप्रेमींचा आग्रह

म. टा. प्रतिनिधी, ठाणे

प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तींमुळे जलप्रदूषणाची मात्रा वाढत असल्याने त्याचा वापर कमी करून शाडूच्या मातीच्या गणेशमूर्तींच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचा प्रयत्न होत आहे. याशिवाय कृत्रिम तलावांचाही वापर केला जात असला, तरीही खाडीपात्रातील गणेश विसर्जनामुळे निर्माण होणारा गाळ आणि प्रदूषण अद्याप कायम आहे. त्यामुळे धातूची किंवा इतर कोणत्याही वस्तूपासून तयार करण्यात आलेली कायमस्वरूपी गणेशमूर्तींची प्राणप्रतिष्ठा करण्याची गरज पर्यावरणप्रेमींकडून व्यक्त करण्यात आली आहे. ठाण्यातील जिज्ञासा बाल वैज्ञानिकांनी १९९८ साली केलेल्या संशोधनामध्ये पर्यावरण संवर्धनासाठी हा उपाय सुचवल्यानंतर शहरातील पर्यावरणप्रेमींनी कायमस्वरूपी गणपतीची चळवळ सुरू केली होती. या चळवळीला अधिक बळ देण्यासाठी पुढील टप्प्यात प्रयत्न करण्याकरिता पर्यावरणप्रेमींकडून तयारी सुरू करण्यात आली आहे....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/gP0jDAAA

📲 Get Thane News on Whatsapp 💬