[Thane] - पत्नीला परत आणत नसल्याने आईची हत्या

  |   Thanenews

म. टा. वृत्तसेवा, कल्याण

माहेरी गेलेल्या पत्नीला परत आणत नसल्याच्या रागातून जन्मदात्या माऊलीचीच हत्या केल्याची धक्कादायक घटना कल्याण पश्चिमेकडील भोईवाडी परिसरात बुधवारी संध्याकाळच्या सुमारास घडली. या प्रकरणी बाजारपेठ पोलिसांनी अमन मुल्ला या आरोपीविरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे.

कल्याण पश्चिमेकडील भोईवाडा परिसरातील गफूर पॅलेस इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील एका घरात महिलेचा जोरजोरात ओरडण्याचा आवाज येत होता. परिसरातील रहिवासी इमारतीच्या खाली जमा झाले, मात्र कोणी वर जायला तयार नव्हते. थोड्याच वेळात घाबरलेली एक महिला दोन मुलांना घेऊन शेजारच्या घरात आली. तिने अमन मुल्ला या तरुणाने आई रुखसाना हिच्यावर प्राणघातक हल्ला केल्याचे सांगितले. यानंतर शेजाऱ्यांनी या घटनेची माहिती बाजारपेठ पोलिसांना दिली. पोलिस घटनास्थळी पोहोचले तेव्हा अमन आईची हत्या करून एका कोपऱ्यात बसला होता. हातात मिळेल त्या वस्तूने अमनने आईवर हल्ला करत तिची हत्या केली होती. अमनच्या पत्नीला त्याच्या आईने जबरदस्तीने माहेरी धाडले होते. अनेक दिवसांपासून ती परत येत नव्हती. यामुळे अमन वारंवार बायकोला बोलवून घे, अशी विनंती आईला करत होता. मात्र आई ऐकत नसल्यामुळे अमन चिडला होता. याच घटनेवरून पुन्हा रुखसाना आणि अमन यांच्यात वाद झाले. वाद विकोपाला पोहोचल्यानंतर चिडून अमनने आईची रागाच्या भरात हत्या केली. यावेळी त्याची वहिनी दोन मुलांसह घरातच होती. मात्र संतापलेल्या अमनचा अवतार पाहून तो आपल्यालादेखील मारेल, अशी भीती वाटल्याने वहिनीने दोन मुलांना घेत घराबाहेर धाव घेत स्वत:चा जीव वाचवला. पोलिसांनी वहिनीच्या तक्रारीवरून अमनविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे.

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/bTyjzAAA

📲 Get Thane News on Whatsapp 💬