[Thane] - पूरग्रस्त कुटुंबाना मोफत धान्याचे वाटप

  |   Thanenews

मटा इम्पॅक्ट

म. टा. प्रतिनिधी, ठाणे

पूरग्रस्त कुटुंबांना प्रत्येकी १० किलो गहू आणि तांदूळ मोफत देण्याच्या सरकारच्या निर्णयानंतरही ठाणे जिल्ह्यातील पूरग्रस्तांच्या पदरी निराशा पडली होती. धान्यवाटप लाल फितीत अडकल्याने पूरग्रस्त कुटुंब मोफत धान्यापासून वंचित असल्याबाबत 'मटा'ने वृत्त प्रकाशित करताच जिल्हा प्रशासन खडबडून जागे झाले. प्रशासनाने तातडीने रेशनिंग विभागाला कुटुंबांची यादी पाठवल्याने रेशनिंग दुकानातून कुटुंबाना मोफत धान्याचे वाटप करण्यास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत भिवंडी, कल्याण-डोंबिवली, अंबरनाथ आदी भागांतील दोन हजारांहून अधिक कुटुंबांना धान्याचा लाभ मिळाला असून मोफत धान्यवाटपाची प्रक्रिया अद्यापही चालू आहे.

२६ आणि २७ जुलै रोजी पावसाने ठाणे जिल्ह्याला चांगलेच झोडपून काढले होते. अनेक भागांत पूरपरिस्थिती निर्माण होऊन नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने हाहाकार उडाला होता. घरातील सामानाचे नुकसान झाल्याने घरातील अन्नधान्यापासून अन्य सामान फेकून देण्याची वेळ ओढवली होती. पूरग्रस्तांना दिलासा देण्यासाठी सरकारने ७ ऑगस्ट रोजी परिपत्रक काढून तात्काळ दहा किलो गहू आणि तांदूळ मोफत देण्याचे आदेश दिले होते. मात्र या निर्णयाची अंमलबजावणी रखडल्याने पूरग्रस्त कुटुंबांच्या पदरात धान्याचा एक कणही पडला नव्हता. शहरी भागातील पूरग्रस्त कुटुंबांची यादीच महसूल विभागाकडून रेशनिंग विभागाला उपलब्ध झाली नव्हती. मागणी करूनही यादी देण्यास दिरंगाई झाली होती. इतरही अडचणी असल्याने पूरग्रस्तांना धान्य मिळाले नव्हते. 'महाराष्ट्र टाइम्स'मध्ये 'धान्यवाटप लाल फितीत' या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित झा ल्यानंतर जिल्हा प्रशासन जागे झाले. प्रशासनाने २० हजार ६२३ पूरग्रस्त कुटुंबांची यादी रेशनिंग विभागाला दिल्यानंतर या कुटुंबांना मोफत गहू, तांदळाचे वाटप रेशनिंग दुकानातून करण्यात येत आहे. कल्याणमधील १३५१ कुटुंब, डोंबिवली २७३, भिवंडी ४१३, अंबरनाथ २८६ असे सुमारे २ हजार ३०० पेक्षा अधिक कुटुंबांना मोफत धान्याचे वाटप केल्याची माहिती रेशनिंगच्या अधिकाऱ्यांनी दिली....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/yjG96gAA

📲 Get Thane News on Whatsapp 💬