[Thane] - पालघर रेल्वे स्थानकात थेट रिक्षा घुसवली

  |   Thanenews

पालघर: पालघर रेल्वे स्थानकातील फलाटावरच थेट रिक्षा घुसवल्याचा प्रकार बुधवारी घडला. या प्रकरणी रिक्षा चालकाला अटक केली आणि त्यानंतर त्याची जामिनावर सुटका केली. पिंटू श्रीवास्तव (वय ३४) असं त्याचं नाव आहे. महिनाभरातील ही दुसरी घटना आहे.

गेल्या महिन्यात सागर गावड या ३४ वर्षीय चालकानं विरार रेल्वे स्थानकात थेट रिक्षा घुसवली होती. एका गरोदर महिलेला तातडीने रुग्णालयात पोहोचवलं होतं. या प्रकरणी त्याला अटक करून जामिनावर सोडण्यात आलं होतं. अशीच घटना बुधवारी दुपारी पालघर रेल्वे स्थानकात घडली. रिक्षाचालक श्रीवास्तव रेल्वे स्थानकाबाहेरच होता. ८५ वर्षीय वृद्धाला अस्वस्थ वाटत असल्याचं एका व्यक्तीनं त्याला सांगितलं. त्यामुळं त्या वृद्धाच्या मदतीसाठी श्रीवास्तव धावून गेला. त्यानं रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक एकवर रिक्षा आणली आणि वृद्धाला घेऊन जवळच्या रुग्णालयात दाखल केलं....

फोटो - http://v.duta.us/YE5ZSQAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/MRAMxQAA

📲 Get Thane News on Whatsapp 💬