[Thane] - वाहतूककोंडीचे शुक्लकाष्ठ

  |   Thanenews

खड्डेदुरुस्तीसाठी पुन्हा मुंबई-नाशिक महामार्गावर वाहनांच्या रांगा

म. टा. प्रतिनिधी, ठाणे

ठाण्यातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहतूककोंडी निर्माण होऊन रस्त्यांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. गुरुवारी खड्डेदुरुस्तीसाठी पुन्हा कोंडी झाली होती. मुंबई-नाशिक महामार्गावर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून खड्डेदुरुस्तीची कामे हाती घेतली होती. तर, काही ठिकाणी खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने मार्गिका बंद झाल्या होत्या. त्यामुळे मानपाडापासून नाशिक महामार्गापर्यंत संपूर्ण मार्गिका जड-अवजड वाहनांनी भरून गेल्या होत्या. दुरुस्तीकामामुळे कोंडी झाल्याचे वाहतूक पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. गणेशोत्सवाच्या तोंडावर सातत्याने निर्माण होणाऱ्या वाहतूककोंडीमुळे नागरिक हवालदिल झाले असून यातून सुटका करण्यासाठी कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी वाहनचालकांकडून करण्यात आली आहे.

ठाण्यातील घोडबंदर रस्त्यावर गुरुवारी मोठ्या प्रमाणात खड्डेदुरुस्तीच्या कामांना सुरुवात करण्यात आली होती. दुपारी जड-अवजड वाहने रस्त्यावर आली असताना त्यात दुरुस्तीचे काम यामुळे वाहनांच्या रांगा लांबपर्यंत पसरल्या होत्या. पूर्वद्रुतगती महामार्गावरून मुंबई-नाशिक महामार्गाच्या दिशेने जाणाऱ्या मार्गिकांवर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. दररोज खड्ड्यांमुळे कोंडीत सापडणारे नागरिक गुरुवारी खड्डेदुरुस्तीमुळे कोंडीत सापडले होते. पावसाळ्यापासून चार ते पाचव्यांदा ही दुरुस्तीकामे हाती घेण्यात आली होती. त्यामुळे खड्डे दुरुस्त केल्यानंतर वारंवार खड्डे का पडतात, असा वाहनचालकांचा प्रश्न होता. परंतु पावसामुळे खड्डे पडत असून ते दुरुस्त करण्याशिवाय पर्याय नसल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. वाहतूक पोलिसांनी यासाठी परवानगी दिल्याने टप्पाटप्प्यावर दुरुस्तीसाठी रस्ते बंद करण्यात येत होते. काम पूर्ण झाल्यावर पुन्हा पुढील भागात रस्ता बंद केला जात होता. त्यामुळे वाहनांचा रडतखडत प्रवास सुरू होता. वाहनांच्या रांगातून वाट काढताना वाहनचालकांची मोठी दमछाक झाली होती तर कोंडी सोडविण्यासाठी उभे पोलिसही हवालदिल झाले होते....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/RTa9TwAA

📲 Get Thane News on Whatsapp 💬