[Thane] - शिक्षक पुरस्कारावरून नाराजीचा सूर

  |   Thanenews

अन्याय झाल्याचा शहापूरच्या शिक्षकांचा आरोप

म. टा. प्रतिनिधी, ठाणे

जिल्हा परिषद प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्या वादांमुळे रखडलेले २०१८ सालचे आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यास प्रशासनाला मुहूर्त सापडला, मात्र दिरंगाईच्या या कारभारानंतरही पुरस्कारांबाबत शिक्षक तसेच शिक्षक संघटनांनी नाराजीचा सूर आळविला आहे. शिक्षक दिनानिमित्त गुरुवारी गाजावाजा करत प्रशासनाने पुरस्कार सोहळ्याचा बेत आखला असला तरी रखडलेल्या पुरस्कारांमध्ये समितीसमोर सर्व निकषांवर अग्रेसर ठरूनही डावलेले गेल्याचा आरोप शहापूर येथील शिक्षकांनी केला आहे. लोकप्रतिनिधींच्या मर्जीतील शिक्षकांच्या गळ्यातच यंदाही पुरस्काराची माळ पडली असल्याचा आरोप शिक्षक संघटनांनी केला असला तरी, दोन्ही वर्षांचे पुरस्कार हे एकाच शासन निर्णयाप्रमाणे पारदर्शकतेने दिल्याचा बचावात्मक पवित्रा प्रशासनातर्फे घेण्यात आला आहे.

दोन वर्षांपासून शिक्षक दिनानिमित्त देण्यात येणाऱ्या आदर्श शिक्षक पुरस्काराचा मुहूर्त जिल्हा परिषदेकडून हुकला होता. शिक्षकांना प्रोत्साहनपर दिला जाणारा हा पुरस्कार शिक्षण दिनी देण्यात येत असला तरी प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यातील वादामुळे २०१८मध्ये हा पुरस्कार एकाही शिक्षकाला जाहीर झाला नव्हता. २०१८-१९ या वर्षाच्या आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी जिल्ह्यातील सर्व पात्र शिक्षकांना अर्ज दाखल करता यावा, यासाठी ठाणे जिल्हा परिषदेने मोठा गाजावाजा करीत राज्यस्तरीय पुरस्काराप्रमाणे निवड प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबविली. प्रत्येक तालुक्यातील तीन शिक्षकांचे अर्ज जिल्हा परिषदेत मागविण्यात आले.. प्रक्रियेत पारदर्शकता असावी, यासाठी शिक्षण क्षेत्रात राष्ट्रीय क्षेत्रात कार्यरत असलेल्या तज्ज्ञांच्या समितीकडे निवडीचे अधिकार देण्यात आले होते. प्रत्यक्ष मुलाखतीसह शिक्षकांच्या कार्याचा आढावा घेत या समितीने शिक्षकांचे गुणांकन केले होते. निवडण्यात आलेल्या शिक्षकांची माहिती प्रशासनाला दिल्यानंतर...

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/a0m_AAAA

📲 Get Thane News on Whatsapp 💬