अकोल्याला ‘वान’च्या पाण्यासाठी किमान तीन वर्षे प्रतीक्षा!

  |   Akolanews

राजरत्न सिरसाट

अकोला : अकोलेकरांची जीवनरेखा काटेपूर्णा धरणात यावर्षी अल्प जलसाठा असल्याने अकोल्यावर जलसंकट निर्माण झाले आहे. या संकटातून बाहेर काढण्यासाठी शासनाने वाढीव पाणी पुरवठा योजनेंतर्गत वान धरणातून २४ दशलक्ष घनमीटर पाण्याचे आरक्षण जाहीर केले आहे; परंतु हे पाणी अकोल्यापर्यंत पोहोचण्यासाठी ज्या प्रक्रिया पूर्ण कराव्या लागतील, त्याला कमीत कमी दोन ते तीन वर्षे लागणार आहेत. तसेही अमृत योजनेंतर्गत या वाढीव पाणी पुरवठ्याचे २०३० पर्यंतचे नियोजन आहे.

अकोल्याची लोकसंख्या वेगाने वाढत असून, अकोला महापालिकेंतर्गत २४ गावांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे पाण्याची मागणी वाढली आहे. प्रत्येकाला आवशक दरडोई १४० लीटर पाण्याची गरज पूर्ण करण्यासाठी अलीकडच्या काही वर्षांत काटेपूर्णा धरणाचे पाणी कमी पडत असून, मागील दहा ते पंधरा वर्षांपासून अकोलेकरांनी आवश्यक पाण्याची पूर्तता होत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे कधी आठवड्यात दोन वेळा आता तर एकाच वेळी पाणी पुरवठा होत आहे. याच अनुषंगाने अमृत अभियानांतर्गत वाढीव पाणी पुरवठा योजना येथे राबविण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून वान धरणातून २४ दशलक्ष घनमीटर पाणी मिळणार आहे; परंतु हे पाणी लगेच मिळणार नाही. अकोला ते वारी असा ८० ते ८८ किलोमीटरचा प्रवास करीत हे पाणी येथे येणार आहे. याकरिता जलवाहिनी टाकावी लागणार आहे. त्यासाठीच्या शासकीय प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी वेळ लागणार असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. या सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी दोन ते तीन वर्षांचा कालावधी लागू शकतो. कितीही वेगाने काम करायचे म्हटल्यास यात एखादे वर्ष कमी होइल....

फोटो - http://v.duta.us/nuwqxgAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/NqexjgAA

📲 Get Akolanews on Whatsapp 💬