असंघटित कामगारांचा ९ सप्टेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

  |   Akolanews

अकोला : असंघटित कामगारांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी मजूर संघटना संयुक्त कृती समितीच्या पुढाकारात ९ सप्टेंबर २०१९ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला जाणार आहे.

२८ प्रकारच्या नोंदणीकृत मजुरांच्या हिताच्या योजना असल्याचा शासन गोषवारा करीत असले तरी वस्तुस्थिती वेगळी आहे. नोंदणी करण्यासाठी कागदपत्रे मिळविणे, दिवसभर कार्यालयात उभे राहणे, विशेष म्हणजे कार्यालयात पाण्याची सुविधा नाही, पिण्यासाठी पाणी नाही, अधिकाऱ्यांची मजुरांप्रती चांगली वागणूक नाही. या सर्व बाबी लक्षात घेत मजुरांनी काही ठळक मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. ९ सप्टेंबर रोजी शेकडो कामगारांचा मोर्चा निघणार आहे.

कामगारांच्या प्रमुख मागण्यांमध्ये एक महिन्यात शासन निर्णयानुसार वाटप करावे, अकोला कार्यालयात नूतन नोंदणी सुरू ठेवावी, पिण्याच्या पाण्याची आणि स्वच्छतागृहाची सुविधा उपलब्ध करून द्यावी, प्रत्येक तालुक्यात स्वतंत्र कार्यालय देण्यात यावे, कोणत्याही दोन पाल्यांना शिष्यवृत्ती देण्यात यावी, अशा कामगारांच्या अनेक प्रलंबित मागण्यांसाठी हा मोर्चा काढला जाणार आहे. या मोर्चात असंघटित कामगारांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

फोटो - http://v.duta.us/L9Q-VQAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/G3TuMwAA

📲 Get Akolanews on Whatsapp 💬