एटीएममध्ये २० लाखांचा घोटाळा

  |   Sanglinews

सांगली : प्रतिनिधी

अ‍ॅक्सिस बँकेच्या मिरज व कुपवाड येथील ‘एटीएम’मध्ये पैसे न भरता 20 लाखांचा घोटाळा केल्याचे शुक्रवारी उघडकीस आले. याप्रकरणी जितेंद्र सतीश जगताप (रा. गवळी गल्ली, सांगली) याच्याविरुद्ध विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महिन्याभरात एटीएम घोटाळ्याचे सांगलीतील हे दुसरे प्रकरण उजेडात आले आहे. अ‍ॅक्सिस बँकेने मुंबईतील सी. एम. एस. इन्फो सिस्टीम्स लि. या कंपनीला एटीएममध्ये पैसे भरण्याची एजन्सी दिली होती. कंपनीचे सांगलीत मार्केड यार्डसमोर कार्यालय आहे.

कंपनीने संशयित जितेंद्र जगताप याची एटीएममध्ये पैसे भरण्यासाठी नियुक्‍ती केली होती. त्याच्याकडे सांगली शहर, मिरज, कवठेमहांकाळ, कुपवाड एमआयडीसी परिसरातील बँकांमध्ये पैसे भरण्याची जबाबदारी सोपविली होती. कंपनीमार्फत दरमहा एटीएमचे लेखापरीक्षण केले जाते. यामध्ये महिन्याभरात एटीएममध्ये किती रक्कम भरली? किती शिल्लक राहिली? याचा आढावा घेतला जातो. तसा संबंधित बँकांना अहवाल सादर केला जातो. जगताप याच्याकडे जबाबदारी असलेल्या एटीएममध्ये लेखापरीक्षण करण्यात आले....

फोटो - http://www.pudhari.news/news/Sangli/2-lakh-scam-in-ATMs-in-sangli/1.jpg

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://www.pudhari.news/news/Sangli/2-lakh-scam-in-ATMs-in-sangli/

📲 Get Sanglinews on Whatsapp 💬