कोकण रेल्वे मार्गावर मुंबई ते रत्नागिरी दोन विशेष गाड्या

  |   Maharashtranews

मुंबई : कोकण रेल्वे मार्गावरील गर्दी लक्षात घेऊन आणखी दोन विशेष गाड्या सुरु करण्यात आल्या आहेत. गणेशोत्सव काळात कोकणात जाणाऱ्या रेल्वेगाड्यांना असणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेता मध्य आणि कोकण रेल्वेने रत्नागिरीसाठी दोन विशेष रेल्वे चालविण्याचा निर्णय घेतला आहे. आजपासून या विशेष गाडीचे आरक्षण प्रवाशांना करता येणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते रत्नागिरी मार्गावर या या दोन नवीन दोन विशेष गाड्या धावणार आहेत. उद्या ८ सप्टेंबर रोजी ही विशेष गाडी सीएसएमटीहून रात्री १२.३० मिनिटांनी सुटणार आहे, रत्नागिरी येथे त्याच दिवशी सकाळी १० वाजता पोहोचेल. तर या गाडीचा परतीचा प्रवास उद्याच सायंकाळी ७ वाजता सुरू होणार होईल. ही गाडी सीएसएमटी स्थानकात दुसऱ्या दिवशी सकाळी ५ वाजता पोहोचणार आहे....

फोटो - http://v.duta.us/U6ZmIAAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/u37IyAAA

📲 Get maharashtranews on Whatsapp 💬