कडकनाथ घोटाळा : ईडीकडे तक्रार

  |   Sanglinews

सांगली : प्रतिनिधी

कडकनाथ कुक्कुटपालनात महारयत अ‍ॅग्रो इंडिया या कंपनीकडून शेतकर्‍यांची मोठी फसवणूक झाली आहे. कंपनीचे संचालक व संबंधितांची चौकशी करावी. सर्व बँक खाती सील करावीत, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी शुक्रवारी ईडीकडे केली आहे.

शेट्टी यांनी मुंबई येथे अंमलबजावणी संचालनालयाचे (ईडी) विभागीय विशेष महासंचालक सुशीलकुमार यांची भेट घेऊन या प्रकरणात अडकलेल्या शेतकर्‍यांच्या तक्रारी सांगितल्या. याबाबतीत पुराव्याची महत्त्वाची कागदपत्रे ईडीकडे दिली. तसेच दोषी व्यक्‍तींची मालमत्ता जप्त करून शेतकर्‍यांचे पैसे त्वरित परत द्यावेत, असे निवेदनही यावेळी दिले.

शेट्टी यांनी ईडीला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ईडीकडून सर्व संचालक व संबधितांची संपत्ती ताब्यात घेणार आहे. या महिन्याअखेरपर्यंत ही कारवाई सुरू करू, अशी माहिती सुशिलकुमार यांनी दिली आहे. महारयत अ‍ॅग्रो इंडिया कंपनीने संपूर्ण महाराष्ट्रात कडकनाथ कोंबडी पाळा व कोट्याधीश व्हा, असे आमिष दाखवून प्रचंड पैसे गोळा केले आहेत. पिले आणि अंडी आम्ही खरेदी करू, तसेच खाद्य पुरवू असे सांगून 10 हजार शेतकर्‍यांकडून लाखो रूपये उकळून सुमारे 500 कोटी रूपयांचा गंडा घातला आहे....

फोटो - http://www.pudhari.news/news/Sangli/Kadaknath-scam-complaint-to-ED/1.jpg

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://www.pudhari.news/news/Sangli/Kadaknath-scam-complaint-to-ED/

📲 Get Sanglinews on Whatsapp 💬