कडकनाथ : ३२ शेतकर्‍यांच्या तक्रारी दाखल

  |   Sanglinews

विटा : वार्ताहर

कडकनाथ प्रकरणात फसवणूक झालेल्या खानापूर तालुक्यातील 32 शेतकर्‍यांनी शुक्रवारी विटा पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केले.पोलिसांनी ते दाखल करुन घेऊन त्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग केला आहे. शेतकर्‍यांनी तक्रार अर्ज दाखल करण्याची मागणी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील सुतार यांनी केली होती.

तालुक्यातील अनेक गावात या घोटा़ळ्याचे लोण पसरले आहे. अनेकांनी व्याजांने पैसे काढून भरले आहेत. आज बत्तीस शेतकर्‍यांच्या तक्रारी विटा पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आल्या. तक्रारदारांनी पोलिस ठाण्यात तक्रारी देण्यासाठी रांगा लावल्या होत्या.

जिल्ह्यातील फसवणूक झालेल्या प्रत्येक शेतकर्‍याने त्याची तक्रार त्यांच्या हद्दीतील पोलिस स्टेशनमध्ये द्यावी. तेथे तक्रार घेण्यास टाळाटाळ केली जात असेल तर आमच्याशी संपर्क करावा. आम्ही प्रत्येक शेतकर्‍याला न्याय मिळेपर्यंत त्यांच्या पाठीशी आहोत असे आवाहन सुतार यांनी केले आहे....

फोटो - http://www.pudhari.news/news/Sangli/Kadaknath-sacam-32-farmers-have-filed-complaints-in-vita/1.jpg

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://www.pudhari.news/news/Sangli/Kadaknath-sacam-32-farmers-have-filed-complaints-in-vita/

📲 Get Sanglinews on Whatsapp 💬