कस्तुरी क्लबतर्फे ‘नाच गं घुमा’

  |   Sataranews

सातारा : प्रतिनिधी

दै. ‘पुढारी’ कस्तुरी क्‍लबतर्फे नेहमीच महिलांसाठी नावीन्यपूर्ण उपक्रम राबवले जातात. त्याचअनुषंगाने कस्तुरी क्‍लब आणि मंडईचा राजा गणेशेात्सव मंडळातर्फे यंदा सर्व महिलांसाठी गौरी-गणपती सणाचे औचित्य साधून ‘नाच गं घुमा..’ या पारंपरिक खेळांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमादरम्यान महिलांचे सामुहिक अर्थवशीर्ष पठणही होणार आहे.

हा कार्यक्रम मंगळवार दि. 10 सप्टेंबर रोजी मंडईचा राजा गणेशेात्सव मंडळ, जुनी भाजी मंडई, सदाशिव पेठ सातारा येथे दु 3 ते 6 या वेळात होणार आहे. सर्वांच्या घरी लाडक्या बाप्पांचे आणि गौरीचे आगमन झाले आहे. पुर्वीच्या काळात ‘नाच गं घुमा, काठवट कणा, घागर घुमवणे, सूप नाचवणे, असे पारंपारिक खेळ खेळून रात्र जागवली जायची. मात्र काळानुसार बदल होत गेला आणि असे पारंपारिक खेळ महिला विसरत गेल्या. हेच खेळ पुन्हा ‘पुढारी’ कस्तुरी क्‍लबच्या माध्यमातून पहायला मिळणार आहेत, या खेळांच्या माध्यमातून संस्कृती जपण्याचा प्रयत्न केला जात आहे....

फोटो - http://www.pudhari.news/news/Satara/Conventional-sports-events-organizes-from-kasturi-club/1.jpg

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://www.pudhari.news/news/Satara/Conventional-sports-events-organizes-from-kasturi-club/

📲 Get Satara News on Whatsapp 💬