नव्या वाळूवर चोरट्यांची नजर

  |   Sanglinews

सांगली : संजय खंबाळे

महापुरामुळे कृष्णा, वारणा, येरळा नदीत वाळू मोठ्या प्रमाणावर आली आहे. मात्र या वाळूवर चोरट्यांची नजर आहे. प्रशासनासमोर या चोरट्यांना रोखण्याचे आव्हान आहे. जिल्हा प्रशासनाने याकडे गांभिर्यांने लक्ष दिल्यास वाळू चोरी रोखता येईल, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

जिल्ह्यात वाळू उपसा बंदी आहे. मात्र काही दिवसांपासून वाळू माफियांनी धुमाकूळ घातला आहे. तासगाव, पलूस, मिरज, खानापूर, जत आणि कवठेमहांकाळ या तालुक्यांतील नद्या, ओढे-नाले वाळूसाठी जेसीबीने उपसून पार खरडून काढले होते. यामुळे वाळूसाठा कमी झाला होता. नदीत वाळूच शिल्लक राहिली नव्हती. परंतु महापुरामुळे येरळा, कृष्णा व वारणा नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणात वाळू वाहून आली आहे. यामुळे तस्कर पुन्हा वाळू उपशासाठी सज्ज झाले आहेत. प्रशासनाने वेळीच कडक पावले उचलली नाहीत तर पुन्हा नद्यांची चाळण होण्यास वेळ लागणार नाही....

फोटो - http://www.pudhari.news/news/Sangli/Thieves-look-at-the-new-sand/1.jpg

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://www.pudhari.news/news/Sangli/Thieves-look-at-the-new-sand/

📲 Get Sanglinews on Whatsapp 💬