पर्यटन उद्योगाचा ‘जीएसटी’ 12 टक्के करावा : मुख्यमंत्री

  |   Goanews

पणजी : प्रतिनिधी

राज्यातील हॉटेल व पर्यटन उद्योगासाठी लागू करण्यात आलेल्या 28 टक्के वस्तू व सेवा करात (जीएसटी) कपात करून तो 12 टक्के करावा, यासाठी आपण केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे विनंती करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पर्वरी येथील मंत्रालयात पत्रकारांशी बोलताना दिली.

मुख्यमंत्री सावंत म्हणाले की, राज्यात खाण व्यवसायानंतर पर्यटन हा मुख्य व्यवसाय आहे. या व्यवसायाला उभारी येण्यासाठी गोवा ट्रॅव्हल अँड टुरिझम संघटनेच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी आपल्याला निवेदन दिले. जगातील थायलंड, मलेशिया, बाली आदी देशांशी पर्यटन व्यवसायात स्पर्धा करायची झाल्यास राज्यातील हॉटेल व्यवसायांसाठी जीएसटी कमी करावा, अशी मागणी संघटनेने या निवेदनातून केली आहे. याविषयी आपण वैयक्‍तिकरीत्या केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांच्याशी त्यांच्या गोवा भेटीच्यावेळी चर्चा करणार आहे....

फोटो - http://www.pudhari.news/news/Goa/GST-should-be-12-per-cent-of-tourism-industry/1.jpg

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://www.pudhari.news/news/Goa/GST-should-be-12-per-cent-of-tourism-industry/

📲 Get goanews on Whatsapp 💬