बुलडाणा शहरातील चौकांमध्ये फलकांची गर्दी

  |   Akolanews

लोकमत न्यूज नेटवर्क

बुलडाणा: जाहिरात फलकांच्या माध्यमातून पालिकेला कर मिळत असला तरी शहरातील चौकांचे नैसर्गिक सौंदर्य धोक्यात आले आहे. विधानसभेपूर्वी चौकांमध्ये फलकांची गर्दी झाली असल्याचे दिसून येत आहे. यामुळे अपघात घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अनेक फलक अनधिकृतरीत्या लावण्यात आले असून याकडे पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.

शहरातील प्रमुख चौक नेहमीच विविध राजकीय नेत्यांचे वाढदिवस, निवड, नियुक्ती, विविध उत्पादने व दुकानांच्या जाहिरातींनी गजबलेले दिसून येतात. यामध्ये बसस्थानकाजवळील संगम चौक, जयस्तंभ चौक, स्टेट बँक चौक, कारंजा चौक, त्रिशरण चौक, एडेड चौक, तहसील चौक व चिंचोले चौकाचा समावेश आहे. तात्पुरत्या स्वरूपात बॅनर लावण्यासाठी पालिकेच्या परवानगीची गरज असते. यासाठी पालिकेकडून कर आकारण्यात येतो. मात्र अनेक फलक अनधिकृतरीत्या लावण्यात येत असल्याचेही निदर्शनास येते. याकडे नगर परिषद प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे....

फोटो - http://v.duta.us/9tMxrQAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/7tAmqAAA

📲 Get Akolanews on Whatsapp 💬