भाजप गटनेत्यांकडून भाजप नेत्यांवर भ्रष्टाचार प्रकरणी लेटर बॉम्ब

  |   Maharashtranews

नाशिक : भाजप गटनेत्यांकडून भाजपच्याच नेत्यांवर भ्रष्टाचार प्रकरणी लेटर बॉम्ब टाकल्याने राजकीय भूकंप झाला आहे. भाजप आमदार बाळासाहेब सानप, महापौर रंजना भानसी यांची सत्यमापन चाचणीची (नार्को टेस्ट लाय डिटेक्टर चाचणी ) मागणी करण्यात आली आहे. भाजप गटनेते जगदीश पाटील यांनी महानगरपालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्याकडे ही मागणी केली आहे. या नेत्यांबरोबरच नगरविकास विभागातील अधिकाऱ्यांची लाय डिटेक्टर चाचणीची मागणीही करण्यात आली आहे. त्यामुळे या प्रकणामुळे भाजप अडणीत सापडला आहे. विरोधकांना आयता भ्रष्टाचाराचा मुद्दा हातात मिळाला आहे.

नाशिक महापालिकेतील आमदारांच्या हस्तक्षेपामुळे पालिकेतील पदाधिकाऱ्यांमधील वाद टोकाला पोहोचले आहेत. गुन्हे अन्वेषण प्रशिक्षण केंद्रासाठी महापालिकेने आरक्षण बदलाच्या मंजुर केलेल्या ठरावात आमदार बाळासाहेब सानप आणि महापौर रंजना भानसी तसेच माजी सभागृह नेते संभाजी मोरुस्कर यांच्या दबावातून परस्पर बदल झाल्याचा प्रकार भाजपच्याच गटनेत्यांसह चार नगरसेवकांनी उघडकीस आणला आहे....

फोटो - http://v.duta.us/C_fw9wAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/0Ub_ygAA

📲 Get maharashtranews on Whatsapp 💬