माजी उपसभापती व्हिक्टोरिया फर्नांडिस यांचे निधन

  |   Goanews

पणजी : प्रतिनिधी

माजी उपसभापती तथा माजी सांताक्रुज मतदारसंघाच्या आमदार व्हिक्टोरिया फर्नांडिस (वय ८५) यांचे शनिवारी पहाटे निधन झाले.

सांताक्रुजचे माजी आमदार तसेच फर्नांडिस कुटुंबाचे जवळचे मित्र व्हीक्टर गोन्साल्विस यांनी माहिती देताना सांगितले, की फर्नांडिस एका खासगी इस्पितळात उपचारांसाठी दाखल झाल्या होत्या. त्यांचे शनिवारी पहाटे निधन झाले. फर्नांडिस यांनी उत्तर गोव्यातील सांताक्रुज मतदारसंघाचे १९९४ ते २०१२ या कालावधीत चार वेळा प्रतिनिधीत्व केले. त्यांना २००५ ते २००७ या काळात विधानसभेचे उपसभापती पद भूषविले होते. काँग्रेस पक्षात अनेक वर्षे राहिल्यानंतर २०१२ साली तिकीट नाकारल्याच्या कारणावरून फर्नांडिस यांनी पक्षाचा त्याग केला होता.

काँग्रेस सरकारच्या काळात फर्नांडिस यांना कृषी, मच्छीमारी, पर्यटन, पशु संवर्धन, महिला व बाल कल्याण आदी विविध खात्यांचे मंत्रीपद मिळाले होते. १९६७ साली गोवा स्वतंत्र राज्य असावे म्हणून त्यांनी मतदान प्रक्रियेत तसेच कोकणी राजभाषा आंदोलनात भाग घेतला होता. राजकारणाबरोबर पारंपरिक मच्छीमार आणि रेंदेर बांधवाच्या हक्कासाठी त्या नेहमीच अग्रेसर राहिल्या होत्या....

फोटो - http://www.pudhari.news/news/Goa/former-deputy-speaker-victoria-fernandes-passes-away/1.jpg

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://www.pudhari.news/news/Goa/former-deputy-speaker-victoria-fernandes-passes-away/

📲 Get goanews on Whatsapp 💬