मिरज बसस्थानकावर दहशतवादी हल्ल्याची अफवा

  |   Sanglinews

मिरज : प्रतिनिधी

मिरज बसस्थानकात दहशतवाद्यांनी बॉम्ब ठेवला आहे. दोन दहशतवाद्यांना पकडण्यात आले आहे. पोलिस व दहशतवादी यांच्या चकमक झाल्याच्या अफवेची व्हिडीओ क्‍लिप व्हायरल झाल्याने शहरात एकच खळबळ उडाली. व्हॉट्सअ‍ॅपवर अफवा पसरवणार्‍या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

दहशतवादी हल्ला करण्याच्या उद्देशाने दोन दहशतवादी मिरज बस स्थानकात घुसले. त्यांनी स्थानकात बॉम्ब ठेवला. यावेळी पोलिसांच्या चकमकीत एका दहशतवाद्याला पकडण्यात आले आहे, अशी क्‍लिप शहरात व्हायरल झाली. कर्नाटकातील काही टीव्ही चॅनलनी हे वृत्त दाखवल्याने पोलिस यंत्रणेची तारांबळ उडाली.

पोलिस उपअधीक्षक संदीपसिंह गिल यांच्यासह फौजफाटा बस स्थानकात दाखल झाला. बॉम्ब शोधक पथकामार्फत शोध मोहीम राबविण्यात आली. परंतु तेथे काहीही सापडले नाही.

दरम्यान औरंगाबाद बस स्थानकात दहशवादी हल्ला झाला तर कशी उपाययोजना करावी, याच्या प्रात्यक्षिकाची क्‍लिप मिरज बस स्थानकातील म्हणून व्हॉट्सअ‍ॅपवर व्हायरल करण्यात आली असल्याचे स्पष्ट झाले.

फोटो - http://www.pudhari.news/news/Sangli/Rumors-of-terrorist-attack-on-Miraj-bus-station/1.jpg

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://www.pudhari.news/news/Sangli/Rumors-of-terrorist-attack-on-Miraj-bus-station/

📲 Get Sanglinews on Whatsapp 💬