मूर्तिजापूर तालुक्यातील रस्त्यांचा बोजवारा, वाहनचालकांची कसरत

  |   Akolanews

मुर्तिजापूर : तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांची अतिशय दैनावस्था झाली असून रस्त्यात मोठ-मोठे खड्डे पडले असल्याने वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. खड्डे चुकविण्याच्या नादात किरकोळ अपघातांची संख्या वाढली आहे. तीन वर्षांपूर्वी निकृष्ट पद्धतीने तयार करण्यात आलेल्या रस्त्यांचा पार बोजवारा उडाला आहे.

तालुक्यातील मूर्तिजापूर - हिरपूर, आसरा, रोहणा, ब्रम्ही, ७ नंबर नाका ते भटोरी, चिखली, सोनाळा, गौरखेडी, वाई माना, पिंपरी मोडक, बल्लारखेड, माना, जामठी कर्ली कामरगाव हे तीन वषार्पूर्वी कोट्यावधी रुपये खर्चून बांधण्यात आलेले रस्ते पुर्णपणे उखडले आहेत. पावसाळ्याच्या दिवसात खड्ड्यामध्ये पाणी साचल्याने वाहन चालकांना खड्ड्यांचा अंदाज घेता येत नसल्याने व खड्डे चुकविण्याच्या प्रयत्नात रोज अपघात घडतात. या संदर्भात अनेक निवेदने देऊनही रस्ते दुरुस्त होत नसल्याने नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो....

फोटो - http://v.duta.us/TJv14wAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/pi8rbwAA

📲 Get Akolanews on Whatsapp 💬