महाजनादेश यात्रा 5 सप्टेंबरला जिल्ह्यात

  |   Sataranews

सातारा : प्रतिनिधी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपाची महाजनादेश यात्रा राज्यभर सुरु असून रविवार, दि. 15 सप्टेंबर रोजी ही यात्रा सातारा जिल्ह्यात येणार आहे. त्यावेळी सातारा, वाई याशिवाय कराड दक्षिण मतदार संघातही मुख्यमंत्र्यांच्या जाहीर सभांचे आयोजन करण्यात आले आहे. सातार्‍यातील सभा दुपारी 2 वाजता गांधी मैदान येथे होणार असून त्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे.

महाजनादेश यात्रेच्या नियोजनाबाबत भाजप पदाधिकार्‍यांची शुक्रवारी विश्रामगृहावर नियोजन बैठक झाली. यावेळी जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, नगरसेवक धनंजय जांभळे, अमोल मोहिते, मिलिंद काकडे, अ‍ॅड. प्रशांत खामकर, विकास गोसावी, अभय पवार, दत्ताजी थोरात, विक्रम बोराटे, सुनेशा शहा, दीपिका झाड आदी पदाधिकारी उपस्थित होते.

महाजनादेश यात्रेने सातारा तालुक्यात प्रवेश केल्यावर पहिल्यांदा पाचवड येथे दुपारी 1 वाजता स्वागत करण्यात येणार आहे. त्यानंतर वाढे फाटा येथे जंगी स्वागत करून बाईक रॅलीद्वारे गांधी मैदान येथे येईल. दुपारी 2 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सातार्‍यात गांधी मैदानावर सभा होणार आहे. त्याआधी वाई येथे सकाळी 11 वाजता आगमन होणार व सभा होणार आहे. कराड दक्षिण मतदार संघातही एक सभा होणार असून त्याचे ठिकाण नंतर जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. या यात्रेची जय्यत तयारी करण्यात आली असून त्याची जबाबदारी ज्या त्या पदाधिकार्‍यावर सोपवण्यात आली.

फोटो - http://www.pudhari.news/news/Satara/Mahajandesh-Yatra-in-the-district-on-September-5th/1.jpg

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://www.pudhari.news/news/Satara/Mahajandesh-Yatra-in-the-district-on-September-5th/

📲 Get Satara News on Whatsapp 💬