राणे समर्थकांना राडा भोवला, कणकवली नगराध्यक्ष, माजी जि.प. अध्यक्षांना सक्तमजुरीची शिक्षा

  |   Maharashtranews

सिंधुदुर्ग : वेंगुर्ले येथील राजकीय राड्याचा निकाल लागला असून राणेंसमर्थक तत्कालीन जिल्हापरिषद अध्यक्ष आणि कणकवलीच्या नगराध्यक्षांना ७ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा जिल्हा न्यायालयाने ठोठावली आहे. या निकालानंतर जिल्ह्यात राजकीय भूकंप झाला आहे. पुन्हा एकदा राणे आणि राणे समर्थकांचे विरोधक आक्रमक झाले आहेत.

१ डिसेंबर २०११ मध्ये वेंगुर्ले पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जमावबंदीचा आदेश तोडून वेंगुर्ल्यात घडवलेला राडा आणि तत्कालीन शिवसेना आमदार परशुराम उपरकर यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांवर जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी कट्टर राणे समर्थक म्हणून ओळखले जाणारे कणकवलीचे नगराध्यक्ष समीर नलावडे आणि जिल्हा परिषदेचे तत्कालीन अध्यक्ष, विद्यमान अध्यक्षांचे पती संदेश तथा गोट्या सावंत यांना गुरुवारी जिल्हा न्यायालयाने सात वर्ष सश्रम कारावास आणि ३१,५०० रूपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. याच गुन्ह्यातील उर्वरित ४४ आरोपींना सबळ पुराव्याअभावी निर्दोष सोडण्यात आले. या निकालानंतर राणे समर्थक पुन्हा एकदा टीकेचे धनी होऊ लागलेत...

फोटो - http://v.duta.us/LCnvpAAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/0m41UQAA

📲 Get maharashtranews on Whatsapp 💬