‘वंचित’ ५० टक्के जागांवर ‘ओबीसीं’ना देणार संधी!

  |   Akolanews

लोकमत न्यूज नेटवर्क

अकोला : आगामी विधानसभा निवडणुकीत राज्यातील २८८ जागा लढविण्याची वंचित बहुजन आघाडीची तयारी असून, २८८ जागांपैकी किमान ५० टक्के जागांवर वंचित बहुजन आघाडी ‘ओबीसीं’ना संधी देणार आहे, असे संकेत वंचित बहुजन आघाडीच्या देखरेख समितीचे प्रदेशाध्यक्ष अर्जुन सलगर यांनी शुक्रवारी येथे दिले.

अकोल्यातील शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ‘ओबीसीं’ना सर्वात जास्त आरक्षण देण्याचा वंचित बहुजन आघाडीचा ‘अजेंडा’ असल्याचे सांगत विधानसभा निवडणुकीत राज्यातील सर्व २८८ जागांपैकी किमान ५० टक्के जागा वंचित बहुजन आघाडीकडून ‘ओबीसीं’ना मिळतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. भारिप बहुजन महासंघ आणि वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकारिणींमार्फत राज्यात स्वतंत्ररीत्या पक्षाचे काम करण्यात येत असून, भारिप-बमसं आणि वंचित बहुजन आघाडीमध्ये समन्वय राखण्यासाठी देखरेख समिती गठित करण्यात आली आहे, असेही अर्जुन सलगर यांनी स्पष्ट केले....

फोटो - http://v.duta.us/RDhoiwAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/YP5T-wAA

📲 Get Akolanews on Whatsapp 💬