विराज शिंदे आता धनुष्यबाण हाती घेणार?

  |   Sataranews

वाई : प्रतिनिधी

वाई विधानसभा मतदार संघात तिसरी शक्‍ती निर्माण झाली असून सत्तेच्या सारीपाटातील घराणेशाही राजकारणातून हद्दपार करण्याचा निर्धार शेंदुरजणे गणातील 22 गावामधील प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीत शुक्रवारी घेण्यात आला.

जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष विराज शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हा निर्णय घेण्यात आला असून शिवसेनेत प्रवेश करण्याचे जवळपास निश्‍चित झाले आहे. त्यामुळे आता विराज शिंदे धनुष्यबाण पेलणार का?याबाबतच्या चर्चांना तालुक्यात ऊत आला आहे.

शेंदुरजणे गणातील 22 गावामधील प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक शुक्रवारी पार पडली. यावेळी उपस्थितांनी विराज शिंदे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा निर्धार केला. यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी आपल्या भावना व्यक्‍त केल्या. भुईंज, बोपेगाव या दोन गावाभोवतीच राजकारण फिरत आले आहे.

येत्या वाई विधानसभा निवडणुकीत भुईंज, बोपेगावच्या घराणेशाहीची मक्तेदारी मोडीत काढण्यासाठी नव्या नेतृत्वाची धुरा विराज शिंदे यांच्यावर सोपवण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला. भोसले जाधव म्हणाले, गेली चाळीस वर्षे वाईत सत्तेचे राजकारण भुईंज व बोपेगाव पुरते मर्यादित झाल्याने नूरा कुस्तीचा वास कार्यकर्त्याना येवू लागला आहे. वाई मतदारसंघातील विविध सामाजिक व सहकारी संस्था डबघाईला येवूनही ही घराणी जनतेशी प्रतारणा करत असल्याचा आरोप त्यांनी केला....

फोटो - http://www.pudhari.news/news/Satara/Will-Viraj-Shinde-take-the-dhanyushban-now/1.jpg

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://www.pudhari.news/news/Satara/Will-Viraj-Shinde-take-the-dhanyushban-now/

📲 Get Satara News on Whatsapp 💬