सीएमना काळे झेंडे दाखवणाऱ्या पूजा मोरेंना घेतले ताब्यात

  |   Maharashtranews

उस्मानाबाद : मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवणाऱ्या स्वाभिमानीच्या पूजा मोरे यांना पोलिसांनी उस्मानाबादमधून ताब्यात घेतले आहे. मोर्चा काढण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला होता. याप्रकरणी पोलिसांनी त्यांची उचलबांगडी केली आहे. दरम्यान, या घटनेनंतर उस्मानाबादमधील वातावरण तापले आहे. स्वाभिमानी कार्यकर्त्यांनी पोलिसांचा निषेध केला आहे. दरम्यान, पूजा मोरे यांचा मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावरून व्हायरल झाला. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.

मोरे यांनी मुख्यमंत्र्यांनी मराठवाड्यात दाखल होण्यापूर्वी येथील शेतकऱ्यांसाठी मदत जाहीर करावी, अन्यथा मुख्यमंत्र्यांचे कार्यक्रम होऊ देणार नाही, असा इशारा दिला होता. त्यानंतर पोलीस पूजा मोरे यांचा शोध सुरु होता. मात्र, त्या भूमिगत झाल्याने पोलिसांना सापडत नव्हत्या. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पूजा मोरे यांना उस्मानाबाद पोलिसांनी ताब्यात घेतले आहे....

फोटो - http://v.duta.us/ufXmLQAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/DzIHZAAA

📲 Get maharashtranews on Whatsapp 💬