[Ahmednagar] - अतुल मिळवतात समाजऋण फेडण्याचे समाधान

  |   Ahmednagarnews

माझ्यात आहे सुखकर्ता

अतुल मिळवतात समाजऋण फेडण्याचे समाधान

म. टा. प्रतिनिधी, नगर

ज्या समाजात आपण राहतो, त्या समाजाचे आपल्यावर अनेक उपकार असतात. या विचारातून समाजातील वंचित घटकही आपल्या जाणीवजागृतीत असावा व त्याच्यासाठीही काही छोटे-मोठे काम करून काहीतरी चांगले केल्याचे आत्मिक समाधान मिळवण्याचा प्रयत्न करणारा सुखकर्ता म्हणजे येथील सीजी पॉवर (क्रॉम्प्टन ग्रीव्हज) कंपनीतील प्रॉडक्शन मॅनेजर अतुल सूर्यकांत जैन.

आपण ज्या समाजात राहतो व वावरतो, त्या समाजाचे आपण काही देणे लागतो, या एकमेव उद्देशाने तसेच समाजातील गरजूंना शक्य ती मदत करण्याने मानसिक समाधान मिळते, त्याची तुलना कोणत्याही सुखाशी होऊ शकत नाही, अशी भावना मनी बाळगणारे अतुल जैन रोजच्या व्यस्त कामातून थोडा वेळ काढून काही सामाजिक कार्य करण्याच्या उद्देशाने नगरमधील काही स्वयंसेवी संघटना आणि मित्रांच्या ग्रुपसमवेत काम करतात. मागील चार वर्षांपासून दर हिवाळ्यात ते बस स्टँड, रेल्वेस्टेशन, हॉस्पिटल बाहेर झोपलेल्या गरीबांच्या अंगावर ब्लँकेट पांघरतात. आईच्या स्मृतिनिमित्त दरवर्षी २५ जानेवारीला फिरोदिया वृद्धाश्रमातील ज्येष्ठांना साबण, तेल, ब्रश, पेस्ट, निरमा पावडर, पाण्याच्या बाटल्या व अन्य आवश्यक गरजेच्या वस्तू देतात. यावर्षी जून महिन्यात नगरमधील जिजामाता विद्यालय (भोसले आखाडा, नगर) व जिल्हा परिषद शाळा (खडकवाडी, ता. नेवासा) या दोन शाळांतील गरीब विद्यार्थ्यांना स्कूलबॅग, पॅड, पेन, कंपास पेटी, वॉटरबॅग या शालेय साहित्यासह रेन कोटचे वाटप त्यांनी केले. याशिवाय बाबावाडी व स्नेहालयमधील मुलांसाठी उन्हाळ्यात आंबा पार्टी व हिवाळ्यात हुरडा पार्टी हे त्यांचे दरवर्षीचे दोन उपक्रम या दोन्ही संस्थांतील बच्चेकंपनीच्या चेहऱ्यावर आनंद पसरवून जातात....

फोटो - http://v.duta.us/BdjGhwAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/5Z1AZgAA

📲 Get Ahmednagar News on Whatsapp 💬