[Ahmednagar] - कामरगावला ग्रामस्थांचा रास्ता रोको

  |   Ahmednagarnews

म. टा. वृत्तसेवा, नगरः तालुक्यातील कामरगाव येथे २०१७ साली झालेल्या अवकाळी पावसामुळे १०१ शेतकऱ्यांच्या फुलशेतीचे लाखो रुपयांचे नुकसान झाले होते. महसूल विभागाकडून दिरंगाई झाल्यामुळे सुमारे दोन वर्षांपासून शेतकरी या लाभापासून वंचित आहेत. नुकसानीची भरपाई मिळावी, या मागणीसाठी नगर-पुणे महामार्गावर कामरगाव येथील ग्रामस्थांनी शुक्रवारी रास्ता रोको आंदोलन केले.

दोन वर्षांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे कामरगाव परिसरातील फळबागांचे नुकसान झाले होते. कृषी विभागाने वस्तुनिष्ठ पंचनामे करून वरिष्ठांकडे अनुदान मागणीसाठी प्रस्ताव दिला होता. दोन वर्षांचा कालावधी उलटला तरी अजून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळालेली नाही. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी, यासाठी सामाजिक कार्यकर्ते तुकाराम कातोरे, प्रकाश ठोकळ यांनी कृषी व महसूल विभागाकडे पाठपुरावठा केला होता. प्रशासनाकडून नकारघंटा सुरुच राहिल्याने संतप्त शेतकऱ्यांनी नगर-पुणे रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन केले. तालुका कृषी अधिकारी बाळासाहेब नितनवरे यांनी आंदोलकांचे निवेदन स्विकारले. वरिष्ठ पातळीवर पत्रव्यवहार करून प्रश्न सोडविण्याचे आश्वासन त्यांनी दिले....

फोटो - http://v.duta.us/qtK1GQAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/uButCwAA

📲 Get Ahmednagar News on Whatsapp 💬