[Ahmednagar] - मोदीच खरे गांधीवादीः भाऊ तोरसेकरांचा दावा

  |   Ahmednagarnews

म. टा. प्रतिनिधी, नगरः 'गांधीवादी म्हणवणाऱ्या नेत्यांनाच अजून गांधी कळालेले नाहीत. याउलट, जनतेशी नाळ जुळलेले व गांधीजींच्या विचारधारेवर योजना आणून काम करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदीच खरे गांधीवादी नेते आहेत,' असा दावा ज्येष्ठ विचारवंत भाऊ तोरसेकर यांनी येथे केला.

पंडीत दीनदयाळ व्याख्यानमालेत त्यांचे 'पुरोगामी झाले प्रतिगामी' या विषयांवर व्याख्यान झाले. 'जो पुढच्या काळाकडे बघतो, तो पुरोगामी असतो तर जो मागे बघत असतो तो प्रतिगामी असतो. काळानुसार बदलणे गरजेचे असते. मात्र, पुरोगामी विचारवंत अजून मागेच बघत आहेत,' अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. येथील पंडीत दीनदयाळ पतसंस्थेच्या पुढाकाराने आयोजित व्याख्यानमालेचा समारोप नुकताच झाला. तोरसेकर यांच्या व्याख्यानासह भाजपचे राष्ट्रीय सचिव सुनील देवधर यांचेही व्याख्यान झाले. देवधर यांनी 'एकात्मता मानवता वादातून आधुनिक भारताकडे वाटचाल' या विषयावर मार्गदर्शन केले....

फोटो - http://v.duta.us/eONQ9AAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/XV8fRwAA

📲 Get Ahmednagar News on Whatsapp 💬