[Ahmednagar] - हरेगावला ध्वजवंदन उत्साहात

  |   Ahmednagarnews

मतमाउली यात्रेची तयारी सुरू

म. टा. प्रतिनिधी, नगर

श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव येथील मतमाउली यात्रेची तयारी सुरू झाली आहे. नुकतेच या यात्रेचे ध्वजवंदन उत्साहात झाले. येत्या १४ सप्टेंबरला मुख्य यात्रोत्सव होणार असून, यानिमित्त विविध धार्मिक उपक्रमांची सुरुवात झाली आहे. जिल्ह्यासह राज्यभरातून भाविक रोज पदयात्रेने येथे येत आहेत.

राज्यभरात प्रसिद्ध असलेली श्रीरामपूर तालुक्यातील संत तेरेजा चर्च हरेगाव येथील मतमाउली यात्रा येत्या १४ व १५ सप्टेंबरला होणार असून यात्रेची तयारी सुरू आहे. ६ जुलैपासून दर शनिवारी येथे होत असलेल्या यात्रापूर्व पदयात्रांचा समारोप नुकताच झाला. यानिमित्ताने जिल्हाभरातील भाविकांनी दर शनिवारी हरेगावला येऊन भक्ती उपासना केली. आता मुख्य यात्रोत्सवानिमित्त धार्मिक कार्यक्रम येथे होत आहेत. यात्रोत्सवाची सुरुवात औरंगाबाद धर्मप्रांताचे धर्मगुरू अम्ब्रोज रिबेलो यांच्या हस्ते ध्वजारोहणाने झाली. यावेळी फटाक्यांच्या आतषबाजीत मिरवणूक काढण्यात आली. सजावट केलेल्या रथात मतमाउली मूर्ती व धर्मगुरू विराजमान होते. मिरवणुकीत सर्व धर्मीय भाविक सहभागी झाले होते. ध्वजवंदनानंतर सध्या रोज धर्मगुरूंची प्रवचने येथे होत आहेत. १४ सप्टेंबरला यात्रा महोत्सवदिनी विधिवत मुकुट चढविणे विधी स्थानिक धर्मगुरू पायस, डॉमनिक रिचर्ड यांच्या हस्ते होणार आहे. दुपारी साडेचार वाजता नाशिक धर्मप्रांताचे प्रमुख धर्मगुरू लॉर्ड्स डानियल यांचे प्रवचन होणार आहे. १५ रोजी सकाळी धार्मिक कार्यक्रम व दुपारी संत तेरेजा क्लबवतीने पुरुष गट राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा होणार आहेत.

फोटो - http://v.duta.us/uq__8QAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/NwPbEAAA

📲 Get Ahmednagar News on Whatsapp 💬