[Aurangabad-Maharashtra] - गड-किल्ल्यांसाठी जोरदार निदर्शने

  |   Aurangabad-Maharashtranews

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

राज्यातील गड किल्ल्यांचे हेरिटेज हॉटेलमध्ये रुपांतर करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या निर्णयाच्या विरोधात शहरात पडसाद उमटले. एमटीडीसी किल्ले भाड्याने देणार असल्याचा आरोप करीत मराठा संघटनांनी निदर्शने केली.

गड-किल्ले विकासकाला देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. किल्ल्यांचे महत्त्व कमी करण्याचा हा प्रयत्न असून व्यावसायिकीकरण होऊ देणार नाही, असे सांगत मराठा संघटनांनी शुक्रवारी दुपारी वसंतराव नाईक चौकात निदर्शने केली. अखिल भारतीय छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली यावेळी अप्पासाहेब कुढेकर, अशोक मोरे, बाळासाहेब भुमे, सोमनाथ पवार, शुभम केरे, साहेबराव शिंदे, तेजस पवार, सौरभ शिरसाठ, सचिन पाटील, शुभम खैरनार, प्रतीक पाटील, राज कळसकर, किरण चौधरी आदी उपस्थित होते. कॅनॉट गार्डन परिसरात शिवक्रांती सेनेचे अध्यक्ष संजय सावंत यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करण्यात आली. यावेळी संतोष गायकवाड, संदिप खांडेभराड, रमेश केरे, रवींद्र काळे उपस्थित होते. पुंडलिकनगर येथे छत्रपती शिवाजी महाराज याच्या पुतळ्यासमोर छावा श्रमिक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष ज्ञानेश्वर गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले. यावेळी नीलेश धस, लहु राठोड, महादेव प्रधान, नीलेश उजगरे, दगडू शिंगटे, ज्ञानेश्वर घारे, संदीप राठोड उपस्थित होते....

फोटो - http://v.duta.us/4zSFcwAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/pKw6hgAA

📲 Get Aurangabad-maharashtra News on Whatsapp 💬