[Aurangabad-Maharashtra] - घरफोड्याला पुण्यात बेड्या

  |   Aurangabad-Maharashtranews

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

रोषणगेट भागात घरफोडी करून पुण्याला पसार झालेल्या अट्टल घरफोड्याला जिन्सी पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने अटक केली. आरोपीच्या ताब्यातून ४८ हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

रोषणगेट, शरीफ कॉलनी भागातील शेख रहीम शेख आमीर या आचाऱ्याच्या घरी ३० ऑगस्ट रोजी चोरी झाली होती. रात्री साडेदहा वाजता रहीमची पत्नी ही पाणी आणण्यासाठी गेली असता चोरट्याने दरवाजा उघडा असल्याची संधी साधत घरात प्रवेश केला. आलमारीतील सोन्याचे दागिने आणि रोख अकरा हजार असा ५४ हजारांचा ऐवज चोरून पसार झाला. याप्रकरणी जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या चोरीमागे कुख्यात गुन्हेगार सय्यद हनीफ सय्यद हबीब उर्फ बा (वय २३ रा. शरीफ कॉलनी) याचा हात असल्याची माहिती गुन्हे शोध प्रकटीकरण पथकाला मिळाली होती. या माहितीवरून पथकाने त्याचा शोध घेतला असता तो पुण्याला असल्याची माहिती मिळाली. पथकाने पुणे गाठून हनीफला ताब्यात घेतले. त्याने गुन्हा कबूल करत ४३ हजारांचे सोन्याचे दागिने आणि रोख पाच हजार रुपये पोलिसांच्या स्वाधीन केले. ही कारवाई पोलिस निरीक्षक व्ही. एम. केंद्रे, पीएसआय दत्ता शेळके, रफी शेख, हेमंत सुपेकर, हारुण शेख, संपत राठोड, संजय गावंडे, धनंजय पाडळकर, सुनील जाधव आणि गणेश नागरे यांनी केली.

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/E4czNQAA

📲 Get Aurangabad-maharashtra News on Whatsapp 💬