[Aurangabad-Maharashtra] - ज्येष्ठांमध्ये सर्वाधिक अस्थिरोगाच्या समस्या

  |   Aurangabad-Maharashtranews

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

वयोमान वाढत असल्यामुळेच ज्येष्ठ नागरिकांची संख्या वाढत असून, ज्येष्ठांमध्ये इतर आजारांच्या तुलनेत सर्वाधिक अस्थिरोगांच्या समस्या आहे. त्यामुळेच ज्येष्ठांमधील अस्थिरोगांविषयी आणि त्यावरील अद्ययावत उपचारांविषयी अधिकाधिक अभ्यास-संशोधन व्हायला पाहिजे. त्याचवेळी ज्येष्ठांमधील इतर व्याधींचाही विचार करण्याची वेळ आली आहे. या दृष्टीने 'गॉसिकॉन' परिषदेत व्यापक मंथन होईल, अशी अपेक्षा 'एमजीएम इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ सायन्सेस'चे कुलगुरू डॉ. शशांक दळवी यांनी परिषदेच्या उद्घाटनावेळी व्यक्त केली.

'जेरियाट्रिक ऑर्थोपेडिक सोसायटी ऑफ इंडिया'च्या वतीने ज्येष्ठांमधील अस्थिरोगांविषयीच्या 'गॉसिकॉन-२०१९' परिषदेला शुक्रवारी (६ सप्टेंबर) एमजीएम वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या द्योतन हॉलमध्ये सुरुवात झाली. या परिषदेला डॉ. बी. सी. रॉय पुरस्कार विजेते पद्मश्री डॉ. जॉन एबनेझार, एमजीएम वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र बोहरा, उपअधिष्ठाता डॉ. प्रवीण सूर्यवंशी, विभागप्रमुख डॉ. गिरीश गाडेकर, महाराष्ट्र अस्थिरोग संघटनेचे राज्य सचिव डॉ. प्रकाश सिगेदार, डॉ. राजेंद्र शेवाळे, आयएमएचे शहर सचिव डॉ़ यशवंत गाडे, डॉ. एम. बी. लिंगायत, डॉ. एस. एस. अमरनाथ आदींची उपस्थिती होती. ज्येष्ठांमधील वाढत्या अस्थिरोगाच्या समस्या लक्षात घेऊन त्यावर देशातील समस्त अस्थिरोगतज्ज्ञांमध्ये विचारमंथन घडवून आणण्यासाठीच गॉसिकॉन या आंतरराष्ट्रीय परिषदेला सुरुवात झाली. आता या परिषदेत देश-विदेशातील अस्थिरोगतज्ज्ञ सहभागी होत आहेत आणि परिषदेच्या माध्यमातून 'जेरियाट्रिक ऑर्थोपेडिक्स' विषयाकडे लक्ष वेधले जात आहे, असे डॉ. अमरनाथ म्हणाले. या प्रसंगी शहरातील जागतिक वारसास्थ‌ळांचा गौरव करीत औरंगाबादकरांच्या व 'एमजीएम'च्या अगत्याबद्दल डॉ. एबनेझार यांनी कौतुक केले. डॉ. गाडेकर यांनी उपस्थितांचे आभार मानले....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/-7K3uAAA

📲 Get Aurangabad-maharashtra News on Whatsapp 💬