[Aurangabad-Maharashtra] - तीन दुचाकी लंपास

  |   Aurangabad-Maharashtranews

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

दुचाकी चोरांनी शहरातील तीन दुचाकी विविध भागातून लंपास केल्या. याप्रकरणी संबधीत पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

दुचाकी चोरीचा पहिला गुन्हा बुधवारी सायंकाळी सिडको भागात घडला. परमेश्वर बाबासाहेब (रा. साईनगर, बीड बायपास) यांची दुचाकी चोरट्यांनी चोरून नेली. या प्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसरा दुचाकी चोरीचा गुन्हा २७ ऑगस्ट रोजी सकाळी सात वाजता रमानगर, उस्मानपुरा भागात घडला. येथील सतीश कडुबा नावकर (वय ३२, रा. साबळे निवास, रमानगर) याची दुचाकी चोरट्यांनी चोरून नेली. या प्रकरणी उस्मानपुरा पेालिस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुचाकी चोरीचा तिसरा गुन्हा ३० ऑगस्ट रोजी बीड बायपास भागातील टिल्लू हॉटेलसमोर घडला. येथील भागवत विठ्ठल तांबे (वय ५३, रा. संग्रामनगर, सातारा परिसर) यांची दुचाकी चोरट्यानी हॉटेल समोरून चोरून नेली. या प्रकरणी सातारा पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/QhUrjAEA

📲 Get Aurangabad-maharashtra News on Whatsapp 💬