[Aurangabad-Maharashtra] - पूरग्रस्तांना मदत; पालिकेचे हात वर

  |   Aurangabad-Maharashtranews

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'अकाउंट मायनसमध्ये असल्यामुळे पूरग्रस्तांना निधी देता येत नाही,' असे कारण सांगून महापालिकेने पूरग्रस्तांच्या मदतनिधीला ब्रेक लावला आहे. 'अकाउंट जेव्हा प्लस'मध्ये येईल तेव्हा मदतनिधी देण्याचा विचार करू, असा पवित्रा प्रशासनाने घेतला आहे.

कोल्हापूर, सांगली, सातारा भागात महापुरामुळे मोठे नुकसान असून तेथील नागरिकांच्या मदतीसाठी राज्यभरातून मदतीचा ओघ सुरू झाला. मुख्यमंत्री सहाय्यता निधीत रक्कम जमा झाली. औरंगाबाद महापालिकेने देखील पूरग्रस्तांना मदत करण्याचा निर्णय घेतला. अधिकारी-कर्मचारी संघटनेतर्फे ११ लाख रुपये, तर नगरसेवकांच्या स्वेच्छा निधीतून पाच लाख रुपये, अशी १६ लाखांची मदत करण्याचे ठरविण्यात आले. अधिकारी-कर्मचारी संघटनेतर्फे संघटनेच्या अध्यक्षांनी, तर नगरसेवकांतर्फे महापौरांनी प्रशासनाला पूरग्रस्तांच्या मदतीसंदर्भात पत्र दिले.

महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शहरात येणार असल्याने त्यावेळी त्यांच्याकडे १६ लाख रुपयांचा धनादेश देण्याचे नियोजन महापौरांनी केले होते. तुमच्याकडे आठ-दहा दिवसांचा वेळ आहे, तोपर्यंत धनादेश तयार करा, मुख्यमंत्री शहरात आले की त्यांना देऊ, असे त्यांनी लेखा विभागातील अधिकाऱ्यांना सांगितले होते. मुख्यमंत्री येण्याच्या एक दिवस आधी महापौरांनी लेखा विभागाच्या अधिकाऱ्यांकडे पूरग्रस्तांच्या मदतीच्या धनादेशाची विचारणा केली असता मुख्यलेखाधिकाऱ्यांनी धनादेश देण्यास असमर्थता दर्शविली. पालिकेचे अकाउंट मायनसमध्ये असल्यामुळे आपण १६ लाखांचा धनादेश देऊ शकत नाही, अकाउंट प्लसमध्ये येईल तेव्हा धनादेश तयार केला जाईल, असे उत्तर त्यांनी दिले. या मुद्यावरून महापौर व लेखाधिकारी यांच्यात वाद झाला होता. त्याला दहा दिवस उलटले असून धनादेश तयार झालेला नाही. अकाउंट मानयसमध्ये असल्याचे अद्याप सांगितले जात आहे....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/hfMOagAA

📲 Get Aurangabad-maharashtra News on Whatsapp 💬