[Aurangabad-Maharashtra] - प्रवाशाचे पाकिट मारले, आरोपीला पोलिस कोठडी

  |   Aurangabad-Maharashtranews

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

नांदेड रेल्वे स्थानकावर जनरल डब्यामध्ये चढताना प्रवशाचे पाकिट मारल्याप्रकरणातील आरोपी सिद्धार्थ शिंदे याला लोहमार्ग पोलिसांनी अटक केली. भोकर येथील बिलाल नगरात राहणारे शेख मोसीन शेख यासीन हे चार सप्टेंबर रोजी सायंकाळी सात वाजता नांदेड रेल्वे स्टेशनवर पूर्णा -अदिलाबाद रेल्वेत जनरल डब्यामध्ये चढताना त्यांचा खिसा कापला. चोरट्याने खिशातील रोख १९ हजार रुपये चोरुन नेले असल्याचे शेख मोसीन यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले. या तक्रारीवरुन नांदेड लोहमार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन नांदेड येथील सिद्धार्थ नारायण शिंदे (२१) याला ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान त्याने पाकीट मारल्याची कबुली दिली. त्याला न्यायालयात हजर केले असता, आरोपीला रविवारपर्यंत (८ सप्टेंबर) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी बी. आर. तारे यांनी दिले. सरकार पक्षाच्या वतीने योगेश सरवदे यांनी काम पाहिले.

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/UC4XeQAA

📲 Get Aurangabad-maharashtra News on Whatsapp 💬