[Aurangabad-Maharashtra] - शहराच्या विविध योजनांसाठी सोमवारी मुंबईत बैठक

  |   Aurangabad-Maharashtranews

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहरासंबंधीच्या विविध योजनांच्या संदर्भात राज्याच्या नगर विकास खात्याच्या प्रधान सचिवांनी सोमवारी (९ सप्टेबर) मुंबईत बैठक आयोजित केली आहे. या बैठकीसाठी महापालिका आयुक्तांना बोलविले असून याच वेळी सव्वाशे कोटींच्या निधीतून रस्त्यांची कामे करण्यासाठीची तिसरी यादी शासनाला सादर केली जाण्याची शक्यता आहे.

औरंगाबाद शहरासाठी नवीन वाढीव पाणीपुरवठा योजना तयार करण्यात आली आहे. त्याचा १६७६ कोटींचा 'डीपीआर' तयार करण्यात आला असून त्याला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची तांत्रिक मान्यता मिळाली आहे. या योजनेसंदर्भात सोमवारच्या बैठकीत चर्चा होणार आहे. समांतर पाणीपुरवठा योजनेची प्रलंबित देयके, शहरातील प्रस्तावित रस्ते, भूमिगत गटार योजना, स्वच्छ भारत अभियान या बाबत देखील बैठकीत चर्चा होणार आहे. पाणीपुरवठा योजनेबद्दलच्या आवश्यक माहितीसह बैठकीला उपस्थित रहा, असे नगर विकास खात्याने आयुक्तांना कळवले आहे. बैठकीत पाणीपुरवठा योजनेच्या निविदा प्रक्रियेबद्दल देखील निर्णय होण्याची शक्यता आहे.

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/1Jj17AAA

📲 Get Aurangabad-maharashtra News on Whatsapp 💬