[Aurangabad-Maharashtra] - हिंगोली आमदारांची कामगिरी - हिंगोलीकरांसाठी 'पाणी' प्रश्न गंभीर

  |   Aurangabad-Maharashtranews

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद :

हिंगोली जिल्ह्यात तीन विधानसभा मतदार संघ आहेत. या तिन्ही विधानसभा मतदारसंघातील आमदारांनी गेल्या पाच वर्षांत जिल्ह्यातील 'पाणी' या विषयावर हिंगोलीचा आवाज विधीमंडळात बुलंद केला. जिल्ह्यातील पाणी या विषयानंतर शेती आणि आरोग्य या विषयावरही या आमदारांनी आपल्या भागातील विविध समस्या सत्ताधाऱ्यांसमोर मांडल्या. बेरोजगारी बाबत काँग्रेसचे आमदार संतोष टारफे यांनी एकच प्रश्न मांडला. तर धोरणाविषयक व महिलांच्या समस्येबाबत जिल्ह्यातील तिन्ही आमदारांपैकी एकानेही गेल्या पाच वर्षांत एकही प्रश्न मांडलेला नाही.

'संपर्क' संस्थेने विधीमंडळ कामकाजा दरम्यान आमदारांची उपस्थिती व त्यांनी विचारलेल्या प्रश्नांचा अभ्यास करून काढलेल्या निष्कर्षांतून ही माहिती समोर आली आहे. त्यासाठी विधीमंडळ संकेतस्थळावर उपलब्ध अहवाल आणि २०१४ ते १८ या काळातील सर्व १३ अधिवेशने, त्यातील चर्चा, लक्षवेधी सूचना, तारांकित प्रश्न माहितीचा स्त्रोत म्हणून वापरण्यात आले आहे. या संस्थेने आरोग्य, शिक्षण, पाणी, शेती, बेरोजगारी, बालक, महिला या सात विषयानुरूप जिल्ह्यातील आमदारांच्या प्रश्नांची वर्गवारी केली आहे. हिंगोली जिल्ह्यात तिन्ही आमदारांनी विचारलेल्या १५७ प्रश्नांपैकी आरोग्य विषयक ११, शिक्षण विषयक आठ, पाणी विषयक २१, शेती विषयक १४, बालके विषयक तीन असे प्रश्न विचारण्यात आले आहेत. तर जिल्ह्यातील बेरोजगारी विषयक एकही प्रश्न विचारलेला नाही, अशी माहिती या अहवालातून समोर आली आहे....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/BieiiAAA

📲 Get Aurangabad-maharashtra News on Whatsapp 💬