[Aurangabad-Maharashtra] - हिंदू कुटुंबाला दिली ‘मोहरम’साठी परवानगी

  |   Aurangabad-Maharashtranews

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद

लातूर जिल्ह्यातील एका हिंदू कुटुंबाला त्यांच्या राहत्या घरी मोहरम सण करण्याची परवानगी देण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या.टी. व्ही. नलावडे आणि आर. जी. अवचट यांनी दिले आहेत.

याचिकाकर्ता बाबू रघुनाथ पांचाळ (लोहार) हे मौजे अतनूर (ता. जळकोट, जि. लातूर) येथील रहिवासी आहे. ते त्यांच्या गावी पूर्वजांपासून मोहरम सण त्यांच्या घरी डोला बसवून व पूजा अर्चा करून करतात. पाच ऑगस्ट रोजी याचिकाकर्ता यांनी जळकोटचे पोलिस निरीक्षक यांच्याकडे रीतसर अर्ज देऊन कायद्याच्या चौकटीत राहून मोहरम सण साजरा करण्याची परवानगी मागितली. पोलिसांनी परवानगी नाकारली. याविरुद्ध याचिकाकर्त्याने याचिका केली. सदर याचिकेची सुनावणीवेळी याचिकाकर्ता सामाजिक ऐक्याच्या भावनेने मोहरम सण करत असून आजतागायत कसलाही अनुचित प्रकार घडला नाही. तसेच धर्मनिरपेक्षता आणि धर्मस्वातंत्र्य हे भारतीय राज्यघटनेचा मूलभूत गाभा आहे. तसेच भारतीय नागरिकास घटनेने देऊ केलेल्या धर्मस्वातंत्र्याच्या मूलभूत अधिकारान्वये भारतीय नागरिकास कुठल्याही धर्माचे आचरण करण्याचे स्वतंत्र्य आहे, असा युक्तिवाद याचिकाकर्त्याचे वकील अजिंक्य रेड्डी यांनी केला....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/_BgWYQAA

📲 Get Aurangabad-maharashtra News on Whatsapp 💬