[Kolhapur] - गणेशोत्सवात १५ ते २० प्लास्टिक पिशव्या घरात

  |   Kolhapurnews

कोल्हापूर टाइम्स टीम

एकीकडे प्लास्टिक बंदीसाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून जोरदार घोषणाबाजी होत असताना ऐन गणेशोत्सव काळात घराघरांत १५ ते २० छोट्या-मोठ्या प्लास्टिक बॅगचे घरात आगमन झाले आहे. त्यामुळे ओल्याबरोबर सुक्या कचऱ्याचे प्रमाण घरोघरी वाढले आहे.

घरोघरी गणेशोत्सवाची धामधूम सुरू असून, बाजारपेठेत खरेदीची धूम सुरू आहे. प्रसाद, फुले, पूजेचे साहित्य खरेदी केल्यानंतर प्रत्येक घरात प्लास्टिकच्या १५ ते २० पिशव्या आल्या आहेत. या पिशव्या कमी मायक्रॉनच्या असल्याने धोका वाढला आहे. काही उत्पादकांनी जास्त मायक्रॉनच्या पिशव्या उपलब्ध करून दिल्या असल्या तरी घरोघरी प्लास्टिक कचऱ्याचे ढीग साचू लागले आहेत. कापूस, वाती, पौते या वस्तू कमी मायक्रॉनच्या पिशव्यांतून विक्री होत आहे. उदबत्ती, धूपबत्तीसाठी कमी मायक्रॉनची तर कापरासाठी जाड प्लास्टिक पिशवीचा वापर केला जात आहे. फूल आणि फळे विक्रेत्यांकडून थेट कमी मायक्रॉनच्या कॅरिबॅग्जचा वापर होत आहे. जर्बेरा फुलाच्या विक्रीसाठी फूल आणि देठाच्यामध्ये प्लास्टिकची छोटी बॅग्ज लावली जात आहे. हळद-कुंकू, अष्टगंध, बुक्का, गुलाल यासाठी कमी मायक्रॉनच्या प्लास्टिक पिशव्यांचा सर्रास वापर होत आहे. हल्ली अत्तराच्या फायावरही छोटी प्लास्टिक पिशवी गुंडाळून दिल्याचे चित्र बाजारात पाहायला मिळाले....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/qe0IewAA

📲 Get Kolhapur News on Whatsapp 💬