[Kolhapur] - दुसऱ्या दिवशीही काम बंद

  |   Kolhapurnews

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, यासह विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी शुक्रवारी दुसऱ्या दिवशाही जिल्हाधिकारी कार्यालयासह जिल्ह्यातील तहसील कार्यालयांतील ६०० हून अधिक महसूल कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरूच ठेवले. यामुळे महसूल प्रशासन थंडावले. पूरग्रस्तांना मदत वाटप, पंचनामे यासह सर्वच महसूलचे कामकाज विस्कळfत झाले. त्याची गांभीर्याने दखल घेत जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आंदोलनात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांचा तात्पुरता कार्यभार देण्यासाठी इतर सरकारी विभागातील कर्मचाऱ्यांना घ्यावे, अशी सूचना अस्थापन विभागाच्या तहसीलदार शीतल मुळे यांना दिल्या.

राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्या येथील जिल्हा शाखेच्या नेतृत्वाखाली गुरुवारपासून सुरू असलेल्या आंदोलनात महसूल प्रशासनातील अव्वल कारकून, पदोन्नतीचे नायब तहसीलदार, शिपाई, वाहनचालक, काही मंडल अधिकारी सहभागी आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य प्रवेशव्दाराजवळ मंडप उभारून आंदोलनातील कर्मचाऱ्यांनी दुपारपर्यंत ठिय्या मारला. निवडणूक शाखेतील कर्मचारीही आंदोलनात सहभागी झाल्याने निवडणूक आयोगाकडे तातडीची माहिती पाठविण्यात अडचणी येत आहेत. जमीन, महसूलसह सर्वच विभागाचे कामकाज बंद सदृश्य राहिले. अधिकारी कक्षात आणि कार्यालय कर्मचारीविना असे चित्र दिसत आहे....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/fwiyfwAA

📲 Get Kolhapur News on Whatsapp 💬