[Kolhapur] - पानसरे हत्येप्रकरणी तिघांना अटक, दहा दिवस कोठडी

  |   Kolhapurnews

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी आणखी तिघांना अटक करण्यात आली. कोल्हापूर एसआयटीने ही कारवाई केली. संशयित सचिन प्रकाशराव अंदुरे (वय ३२, रा. जैन मंदिराजवळ, राजबाजार, जि. औरंगाबाद) अमित रामचंद्र बद्दी (२९, रा. हबीब चाळ, जि. हुबळी) आणि गणेश दशरथ मिस्कीन (३० रा. चैतन्यनगर, जि. हुबळी) अशी अटक केलेल्या तिघांची नावे आहेत. त्यांना शुक्रवारी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. एम. माळी यांच्या कोर्टासमोर हजर केले असता १६ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. या प्रकरणी अटक केलेल्यांची संख्या १२ झाली आहे.

पानसरे हत्येपूर्वी बेळगावात झालेल्या बैठका, गोळीबार प्रशिक्षण, हत्येपूर्वी मोटारसायकल चोरी, अंबाबाई मंदिर आणि पानसरे यांच्या बिंदू चौकातील कार्यालय परिसरात संशयितांनी रेकी केल्याच्या आरोप आहे. अंदुरेचा ताबा पुण्याच्या विशेष कोर्टाकडून तर बद्दी आणि मिस्किनचा ताबा मुंबई कोर्टाकडून घेतला....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/miMl9AAA

📲 Get Kolhapur News on Whatsapp 💬