[Kolhapur] - पुन्हा पुराचा धोका

  |   Kolhapurnews

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शहर, परिसर आणि जिल्ह्यात शुक्रवारी दिवसभर पावसाची संततधार कायम राहिली. त्यामुळे जनजीवन विस्कळित झाले. गेल्या महिन्यात याच दिवशी मुसळधार पाऊस आणि महापुराच्या रौद्र रूपाच्या आठवणीने अनेकांच्या ह्रदयात धडकी भरली. तळकोकण आणि सर्वच धरणक्षेत्रांत अतीवृष्टी असल्याने दिवसभरात राजाराम बंधाऱ्यावर तब्बल चार फुट पाणी वाढले. सायंकाळी सात वाजेपर्यंत ३४ फुट ७ इंच पाणी राहिले. यामुळे महिन्यानंतर पुन्हा पुराचा धोका निर्माण झाला आहे.

दोन दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे. सकाळपासून जोरदार सरींवर सरी कोसळत आहेत. यामुळे शहरातील सर्वच सखल भागात पाणी तुंबून राहिले आहे. गेल्या महिन्यात महापुराचे पाणी आलेल्या रमणमळा, नाईक मळा, पुंगावकर मळा, माळी मळा, शाहूपुरी कुंभार गल्ली, गवत मंडई, बुद्ध गार्डननजीकचा परिसर, रिलायन्स मॉल, गाडी अड्डा, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, केव्हीजी पार्क परिसर, सुतार वाडा, कोंडाओळ, महावीर कॉलेज, डायमंड हॉस्पिटल, विन्स हॉस्पिटल, नागाळा पार्क परिसर, खानविलकर पेट्रोल पंप परिसर, सिध्दार्थनगर, सीता कॉलनी, जुना बुधवार पेठ, शुक्रवार पेठ, पंचगंगा तालीम, मस्कुती तलाव, दुधाळी मैदान परिसर, उत्तरेश्वर गवत मंडई, लक्षतीर्थ वसाहत, लक्षतीर्थ वसाहत परिसर, कसबा बावडा परिसरात प्रचंड दलदल निर्माण झाली आहे. यासह महापुराचे पाणी आलेल्या सर्वच अपार्टमेंटमधील कुटुंबांच्या नजरा दिवसभर पंचगंगा नदीच्या पाणी पातळीकडे लागून राहिल्या. पावसामुळे सार्वजनिक गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांची तारांबळ उडाली. पाऊस आणि हवेतील गारव्यामुळे गणेश दर्शनाकडे भक्तांनी पाठ फिरवल्याचे दिसत होते....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/YIP_NAAA

📲 Get Kolhapur News on Whatsapp 💬